आनंदाचा मापदंड : हसरे चेहरे मोजायला मोडक्या पट्ट्या
भारताचा वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्समधला क्रमांक जेव्हा जाहीर होतो, तेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया तीन वेगवेगळ्या गटांमध्ये विभागलेल्या दिसतात. एक गट मोठ्याने म्हणतो – “हे सगळं खोटं आहे, आपण इतके दुःखी नसतो!” दुसरा गट एका डोळ्याने रडत आणि एका डोळ्याने हसत म्हणतो – “पाहा, पाहा, हेच तर आपल्या रोजच्या वास्तवाचं चित्र आहे.” तिसरा गट मात्र शांतपणे डोकं खाजवत …